Wednesday, 6 June 2012

मी लिहिण्यास बसतो तेव्हा
अचानक शब्द हरवतात
कुठे जातात माहित नाही
काही वेळेनंतर कळते
त्यांनी धुमाकूळ घातला
होता मेंदूत....
मेदुतून काही शब्द हृदयाला
जाउन भिडतात
अन
अचानक पेन कागदांवर
काही शब्द उमटवत जात...
काही ठरवलेले...
काही अचानक...
त्याची एक कविता होते !!
त्याची एक कथा होते !!!
मग कादंबरी होते. !!!
याच
शब्दांनी मला लोक
ओळखतील...
कोणी चागले, कोणी वाईट...
म्हणतील...
येथे
एक "अनिल"
सोसाट्याने आला
सेरावेंरा वाहतच
राहिला
आणि  अचानक शांत झाला... तो कायमचा....

अनिल राव