Saturday, 7 April 2012


अंकात वाचा...
नाट्य संगीतावर " मर्म बधातली ठेव ही "
या वर रविकांत जोशी हयची
मुलाखत...३ दर्जेदार कथा, श्रीमंत सयाजीराजे गायकवाड
याच्यावर १ लेख...४ कविता...
मराठी वाङ्‌मय परिषदचे  
६५ वे अधिवेशन
प्रवीण दवणे याचे विचार 
वर १ दर्जेदार लेख...
आज आपली प्रत मागवा

Friday, 6 April 2012

आम्ही वाटसरू
 
आम्ही वाटसरू
दूर असे निघतांना
मागे सोडत चाललो
आठवणीची घराणी...
जे रंग आयुष्यातले
पुसून गेले
ना उमटायचे कधी
पुन्हा पुन्हा ...
आयुष्याचं झाले
हे गाणं निरंतर
पुन्हा एकदा
मागे वळून बघतांना...


अनिल राव
वो मेरा जिगर का
टुकड़ा था आजतक...
आज भी हे !
लेकिन
आज वो मेरेसाथ
...चंद सिक्के
कमा लेता हे !

अनिल राव

Thursday, 5 April 2012

कविता : 1
तू मोकळं हसल्यावर

तू मोकळं हसल्यावर
मी वेचतो माझे शब्द
तुझ्या जवळ लपलेले
कागदावर रेखाटतो
मनमोकळेपणाने...
तू मोकळं हसल्यावर
पावसाळा नसताना देखील
पावसाची एक सर येते
गारव्याच्या मिठीत
क्षितीज सामावलं जातं

अनिल राव

कविता : 2

मी लिहिण्यास बसतो तेव्हा...

मी लिहिण्यास बसतो तेव्हा
अचानक शब्द हरवतात
काही वेळेनंतर कळते
त्यांनी धुमाकूळ घातला
होता मेंदूत
मेदुतून काही शब्द हृदयाला
जाउन भिडतात
अन
अचानक पेन कागदांवर
काही शब्द उमटवत जात
काही ठरवलेले
काही अचानक
त्याची एक कविता होते !!
कथा होते !!!
मग कादंबरी होते. !!!
याच
शब्दांनी मला लोक
ओळखतील
कोणी चागले, कोणी वाईट...
म्हणतील.
येथे
एक "अनिल"
सोसाट्याने आला
सेरावेंरा वाहतच
राहिला
आणि अचानक शांत झाला.
तो कायमचा



अनिल राव