प्रेमाची वाट….
किती तरी वेळेसत्याला पहिले आहे
रात्र रात्र जागत राहताना
कोणाच्या आठवणी आहेत
ज्या त्याला झोपून देत नाहीत….
सकाळ पासून ते रात्री पर्यंत
कोणाचे तरी प्रेम आहे
कदाचीत जे त्याला रडू देत नाही….
कधी कधी त्याचाजवळ जाऊन
मी बसतो……
पण शून्य नजरेतून मला पाहतो
त्या शून्य नजरेत देखील
तो प्रेम शोधत आहे असे वाटते ….
चाळीतील मुले ओरडतात
" वेडा… वेडा… वेडा… "
मारतात दगडाने त्याला
जखमांमुळे तो चिडतो देखील
पण कोणाचा स्पर्श आहे
जो स्पर्श त्याला वेदना देखील
होऊ देत नाहीत….
मनातल्या मनात मी
करतो त्या प्रेमाला हजारवेळा सलाम
ज्या प्रेमामुळे हे तो सर्व सहन करतोय…
मी देखील याच्या सारखाच ना…
थोडाफार वेडा…
तो तर आठवणी वर जगत आहे
असे प्रेम माझे जर हरवले
असते….
तर मी नक्कीच मी वेडा झालो असतो
काही दिवसात हे जग देखील
सोडून गेलो असतो कायमच….