Sunday 18 August 2019

तुला सिनेमा 
पाहिचा होता आणि मला
तुझ्या सोबत
समुद्रकिनारी जायचे होते
तू मानली नाहीस
आंपण सिनेमा पहिला गेलो
पण
तू सिनेमा पाहत असतांना
तुझ्या डोळ्यात
समुद्र इतका आनंद  पाहत होतो
मला माझा आनंद मला मिळाला होता…

Wednesday 22 July 2015

प्रेमाची वाट…. 

किती तरी वेळेस
त्याला पहिले आहे
रात्र रात्र जागत  राहताना
कोणाच्या आठवणी आहेत
ज्या त्याला झोपून देत नाहीत….
सकाळ पासून ते रात्री पर्यंत
कोणाचे तरी प्रेम आहे
कदाचीत  जे त्याला रडू देत नाही….
कधी कधी त्याचाजवळ जाऊन
मी बसतो……
पण शून्य नजरेतून मला पाहतो
त्या शून्य नजरेत देखील
तो प्रेम शोधत आहे असे वाटते ….
चाळीतील मुले ओरडतात
" वेडा…  वेडा…  वेडा…  "
मारतात दगडाने त्याला
जखमांमुळे तो चिडतो देखील
पण कोणाचा स्पर्श आहे
जो स्पर्श त्याला वेदना देखील
होऊ देत नाहीत….
मनातल्या मनात मी
करतो त्या प्रेमाला हजारवेळा सलाम
ज्या प्रेमामुळे हे तो सर्व सहन करतोय…
मी देखील याच्या सारखाच ना…
थोडाफार वेडा…
तो तर आठवणी वर जगत  आहे
असे प्रेम माझे जर हरवले
असते….
 तर मी नक्कीच मी वेडा झालो असतो
काही दिवसात हे जग देखील
सोडून गेलो असतो कायमच…. 

















Wednesday 12 November 2014

समांतर भाग्य दिवाळी अंक २०१४

 समांतर भाग्य दिवाळी अंक २०१४
प्रकाशित झाला आहे. 
भारतातील जवळ जवळ ३० साहित्याकाराचे 
साहित्य त्यात सामावले आहे. 
किमत रु. ७०/- ( वार्षिक वर्गणी रु. १५०/-) 
तसेच 
रसिक साहित्य - पुणे / बी डी बागवे अंड कंपनी, मुंबई 
येथे मिळू शकेल. 
अथवा : ०९८९८९२४२७० 
वर आपला पत्ता कळवा : 
अंक पाठविला जाईल रु. साठी महाराष्ट्र बकेतील 
आमच्या खाते कालवले जाईल त्यात रक्कम जमा 
करावी 

अनिल राव 
संपादक 
समांतर भाग्य 
४,तल मजला, सिद्धार्थ कोमप्लेस, 
ब्राह्मणसभा कार्यालय समोर, 
बदोदे. 

Wednesday 26 March 2014

मी मृत्यू पावेन


मी मृत्यू पावेन
आणि तू फुले पाठवशील
जे मी पाहू शकणार नाही
तर तू आत्ताच फुले पाठव नां !

मी मृत्यू पावेन
आणि तुझे अश्रू वाहतील
जे मला कधीच दिसणार नाही
तर तू आत्ताच थोडं रडून घे नां !

मी मृत्यू पावेन
आणि तू माझी कदर करशील
जे मी ऐकू शकणार नाही
तर ते शब्द आत्ताच थोडेसे बोल नां !

मी मृत्यू पावेन
आणि तू सर्व माझे दोष विसरशील
जे मी समजू शकणार नाही
तर तू मला आत्ताच माफ करून दे ना !

मी मृत्यू पावेन
आणि तू माझी आठवण काढशील
जे मी अनुभवू शकणार नाही
तर तू माझी आत्ताच आठवण काढ ना !

मी मृत्यू पावेन
आणि तुला नक्की वाटेल की,
मी त्याच्या बरोबर थोडा जास्त
वेळ काढला असता तर ?
तर तू आत्ताच तसे कर ना !

मूळ गुजराती कविता : नीरज जैन
मराठी : अनिल राव

Wednesday 6 June 2012

मी लिहिण्यास बसतो तेव्हा
अचानक शब्द हरवतात
कुठे जातात माहित नाही
काही वेळेनंतर कळते
त्यांनी धुमाकूळ घातला
होता मेंदूत....
मेदुतून काही शब्द हृदयाला
जाउन भिडतात
अन
अचानक पेन कागदांवर
काही शब्द उमटवत जात...
काही ठरवलेले...
काही अचानक...
त्याची एक कविता होते !!
त्याची एक कथा होते !!!
मग कादंबरी होते. !!!
याच
शब्दांनी मला लोक
ओळखतील...
कोणी चागले, कोणी वाईट...
म्हणतील...
येथे
एक "अनिल"
सोसाट्याने आला
सेरावेंरा वाहतच
राहिला
आणि  अचानक शांत झाला... तो कायमचा....

अनिल राव

Saturday 7 April 2012


अंकात वाचा...
नाट्य संगीतावर " मर्म बधातली ठेव ही "
या वर रविकांत जोशी हयची
मुलाखत...३ दर्जेदार कथा, श्रीमंत सयाजीराजे गायकवाड
याच्यावर १ लेख...४ कविता...
मराठी वाङ्‌मय परिषदचे  
६५ वे अधिवेशन
प्रवीण दवणे याचे विचार 
वर १ दर्जेदार लेख...
आज आपली प्रत मागवा