Wednesday, 12 November 2014

समांतर भाग्य दिवाळी अंक २०१४

 समांतर भाग्य दिवाळी अंक २०१४
प्रकाशित झाला आहे. 
भारतातील जवळ जवळ ३० साहित्याकाराचे 
साहित्य त्यात सामावले आहे. 
किमत रु. ७०/- ( वार्षिक वर्गणी रु. १५०/-) 
तसेच 
रसिक साहित्य - पुणे / बी डी बागवे अंड कंपनी, मुंबई 
येथे मिळू शकेल. 
अथवा : ०९८९८९२४२७० 
वर आपला पत्ता कळवा : 
अंक पाठविला जाईल रु. साठी महाराष्ट्र बकेतील 
आमच्या खाते कालवले जाईल त्यात रक्कम जमा 
करावी 

अनिल राव 
संपादक 
समांतर भाग्य 
४,तल मजला, सिद्धार्थ कोमप्लेस, 
ब्राह्मणसभा कार्यालय समोर, 
बदोदे. 

Wednesday, 26 March 2014

मी मृत्यू पावेन


मी मृत्यू पावेन
आणि तू फुले पाठवशील
जे मी पाहू शकणार नाही
तर तू आत्ताच फुले पाठव नां !

मी मृत्यू पावेन
आणि तुझे अश्रू वाहतील
जे मला कधीच दिसणार नाही
तर तू आत्ताच थोडं रडून घे नां !

मी मृत्यू पावेन
आणि तू माझी कदर करशील
जे मी ऐकू शकणार नाही
तर ते शब्द आत्ताच थोडेसे बोल नां !

मी मृत्यू पावेन
आणि तू सर्व माझे दोष विसरशील
जे मी समजू शकणार नाही
तर तू मला आत्ताच माफ करून दे ना !

मी मृत्यू पावेन
आणि तू माझी आठवण काढशील
जे मी अनुभवू शकणार नाही
तर तू माझी आत्ताच आठवण काढ ना !

मी मृत्यू पावेन
आणि तुला नक्की वाटेल की,
मी त्याच्या बरोबर थोडा जास्त
वेळ काढला असता तर ?
तर तू आत्ताच तसे कर ना !

मूळ गुजराती कविता : नीरज जैन
मराठी : अनिल राव